ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दिल्लीच्या सुकृती गुप्ताने ५०० पैकी ४९७ गुण मिळवत देशात प्रथन येण्याचा मान मिळवला आहे.
यावर्षी एकूण ८३.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.५८ टक्के विद्यार्थिनींना व ७८.८५ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले.
१ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी एकूण १० लाख ६७ हजार, ९०० विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या निकालातही तिरूअनंतपुरम विभागाने बाजी मारली आहे. तिरूअनंतपुरम्चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.६१ टक्के लागला आहे.