शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

‘सीबीएसई’,‘आयसीएसई’ची १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 6:20 AM

राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची होत नसल्याने सीबीएसई व आयसीएसईने बारावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा रद्द करण्याचे ठरविले आहे. कोरोनाचा फैलाव होण्याआधी ४० पैकी २९ विषयांची परीक्षा झाली होती. राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही.कोरोनाची साथ कमी वाढत असल्याने परीक्षा घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. त्यावर न्या. अजय खानविलकर , न्या. दिनेश महेश्वरी व न्या. संजय खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली, तेव्हा सीबीएसईच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंडळाचा वरील निर्णय कळविला. आयसीएसईही याचेच अनुकरण करेल, असे ज्येष्ठ वकील जयदीप गुप्तायांनी सांगितले.सीबीएसईच्या निर्णयाची माहिती देत मेहता म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांना राहिलेल्या विषयांची परीक्षा देण्याची सक्ती असणार नाही. शाळांनी याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेतही गुण दिले जातील. ज्यांना हे गुणांकन पसंत नसेल त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी एक परीक्षा देण्याची संधी मिळेल. ही परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावरघेण्यात येईल. जे विद्यार्थी तो पर्याय स्वीकारतील, त्यांना त्या परीक्षेतील गुण अंतिम मानले जातील.>केंद्रच निर्णय घेईलमहाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांनी परीक्षा घेऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे जे विद्यार्थी सरकारी गुण न स्वीकारता प्रत्यक्ष परीक्षेचा पर्याय स्वीकारतील त्यांची परीक्षा केव्हा घ्यायची, याचा निर्णय राज्यांऐवजी केंद्र सरकारच घेईल, असेही सॉलिसिटर जनरलंनी खंडपीठाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.>आज देणार माहितीआधीच्या तीन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना किती गुण दिले गेले हे तसेच कामगिरी सुधारण्यासाठीची परीक्षा केव्हा होईल, हे १५ जुलैपूर्वी जाहीर केले जाईल. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सरासरी पद्धतीने दिलेले गुण ग्राह्य धरले जातील, असेही ते म्हणाले. दोन्ही मंडळांनी या बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे शुक्रवारी सादर कराव्यात म्हणजे याचिकांवर आदेश देता येतील, असे खंडपीठाने सांगितले.