CBSE 10th 12th Date Sheet 2023: 'सीबीएसई' कडून (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. CBSE 10वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर 12वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत होणार आहे.
CBSE 10वी बोर्ड परीक्षा चित्रकला, राय, गुरुंग, तमांग, शेर्पा आणि थाई पेपरने सुरू होईल. तसेच गणित मानक आणि गणित बेसिक या पेपरने परीक्षा संपेल. बहुतेक पेपरसाठी परीक्षेची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत असेल. CBSE 12वी बोर्ड परीक्षा उद्योजकता पेपरने सुरू होईल आणि मानसशास्त्र पेपरने संपेल. 12वीच्या परीक्षेची वेळ बहुतेक पेपरसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत असेल.
डेटशीट जाहीर करताना, CBSEने एका निवेदनात म्हटले आहे की, दोन विषयांच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर देण्यात आले आहे. CBSE ने सांगितले की, एकाच तारखेला कोणत्याही विद्यार्थ्यांची दोन विषयांची परीक्षा होणार नाही याची खात्री करण्यासाठी सुमारे 40,000 विषय संयोजन टाळून इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी ची डेटशीट तयार करण्यात आली आहे. बोर्ड २ जानेवारी २०२३ पासून प्रात्यक्षिक परीक्षा घेईल. CBSE प्रात्यक्षिक आणि प्रकल्प मूल्यांकनासाठी बाह्य परीक्षकाची नियुक्ती करेल.