दिल्लीची एम. गायत्री देशात पहिली : मुलांमध्ये केरळचा बी. अर्जुन प्रथममुंबई : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला. ८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिल्लीच्या एम. गायत्री हिने ४९६ गुण मिळवित देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे; तर मुलांमध्ये केरळ येथील बी. अर्जुन याने ४९५ टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला देशभरातून १० लाख ४० हजार ३६८ विद्यार्थी बसले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १.२ टक्क्यांनी वाढली असली तरी निकालाचा टक्का घसरला आहे. या निकालात तिरूअनंतपुरम् विभागाने बाजी मारली आहे. तिरूअनंतपुरम्चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९५.४१ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९१.१४ टक्के लागला आहे. तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली विभागाचा निकाल ८६.१३ टक्के नोंदविण्यात आला आहे. सीबीएसईच्या १० विभागांमध्ये ६८.७७ टक्के इतका सर्वांत कमी निकाल गुहाटी विभागाचा लागला आहे. परीक्षेला बसलेल्या मुलींचा एकूण निकाल ८७.५६ टक्के लागला आहे; तर मुलांचा निकाल ७७.७७ टक्के लागला आहे. देशभरात दिल्लीच्या एम. गायत्री हिने प्रथम क्रमांक पटकविला असून, उत्तर प्रदेशातील मिथाली मिश्रा हिने ४९५ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळ येथील बी. अर्जुन असून, तो मुलांमध्ये देशातून पहिला आला आहे. (प्रतिनिधी)पुणे : शिरूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील चिन्मय कुमार साहू याने ९५़४० टक्के गुण मिळवत अपंग विद्यार्थ्यांमध्ये देशात १०वा क्रमांक पटकावला आहे.बारावीच्या परीक्षेबरोबरच मी आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यासही करत होतो. मी वर्षभर केवळ एनसीआरटीईच्या पुस्तकांचा मन लावून अभ्यास केला. मी दररोज १० ते १२ तास अभ्यास करत होतो.- चिन्मय कुमार साहू
सीबीएसई बारावीत मुलींची बाजी
By admin | Published: May 26, 2015 2:27 AM