नवी दिल्ली : सीबीएसई दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे रोजी सुरू होणार असून १० जूनपर्यंत चालतील. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बोर्ड परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील.
रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षांचे प्रॅक्टिकल शाळांमध्ये १ मार्चपासून सुरू होतील. सीबीएसईकडून लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षांचे आयोजन करण्याबाबत पालक, विद्यार्थी व देशातील शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. सीबीएसईने यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे.