शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

विद्यार्थी, पालकांसाठी खूशखबर; CBSEची परीक्षा होणार सोपी... जाणून घ्या कशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:29 AM

काठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे.

ठळक मुद्देकाठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेतसीबीएसईची दहावी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे

नवी दिल्ली - काठिण्य पातळीच्या दृष्टीने सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांसाठी सीबीएसईने एक मोठी खूशखबर दिली आहे. यावर्षी सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. त्यामुळे सीबीएसईचे यावर्षीचे पेपर गतवर्षांच्या तुलनेत काही प्रमाणात सोपे असणार आहेत. सीबीएसईची दहावी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.  सीबीएसईच्या यावर्षीच्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय प्रश्नांबाबतचे पर्यायही वाढवण्यात आले आहेत. ''दरवर्षी परीक्षेमध्ये 10 टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. पण यावर्षी मात्र 25 टक्के प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतील. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, त्यांना चांगले गुण मिळवणे शक्य होणार आहे.'' असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच विद्यार्थी एखाद्या प्रश्नाबाबत पूर्णपणे आश्वस्त नसतील तर त्यांच्यासाठी 33 टक्के पर्यायी प्रश्न उपलब्ध असतील, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.  यावेळी विद्यार्थ्यांना एक सुव्यवस्थित प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यात सर्व प्रश्न विविध उपविभागात विभागलेले असतील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकाच विभागात असतील. त्यानंतर अधिक गुण असलेले प्रश्न असतील. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सीबीएसईने यावेळी काही कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर ज्या परीक्षा नियंत्रकांना गोपनीय दस्तऐवज सांभाळायचे आहेत. अशा अधिकाऱ्यांचे रिअल टाइम ट्रँकिंग केले जाणार आहे. गतवर्षी   दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विभागाचा पेपर फुटला होता.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारत