बॅँक व अजिंठा चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद ५४ लाखांची बॅग चोरी : चोरट्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना
By admin | Published: July 19, 2016 11:41 PM
जळगाव: कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबविणारे संशयित काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.
जळगाव: कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबविणारे संशयित काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅँकेच्या मुख्य शाखेत तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ सहा पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.अजिंठा चौकापासून काही अंतरावर असलेल्या राजेंद्र टायर्स या दुकानाच्या समोरुन कोठारी यांच्या कारचा काच फोडून सोमवारी ५४ लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली. सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी कोठारी ज्या मार्गावरुन गेले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यात एचडीएफसी बॅँकेत दोन जण संशयास्पद दिसून येत आहेत तर तेच पुढे अजिंठा चौकात कारच्या मागे दुचाकीवर जातांना दिसून येत आहेत.बॅँकेत त्यांचा व्यवहार नाहीफुटेजमध्ये आलेल्या दोनजणांची पोलिसांनी बॅंकेत चौकशी केली असता त्यांनी सोमवारी बॅँकेत कोणताच व्यवहार केला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे त्यांच्यावरच संशय बळावला आहे. काळ्या शर्ट घातलेला एक रांगेत तर दुसरा पांढरा शर्ट घातलेला बाजूला थांबलेला आहे. बाहेर निघताना दोघंही सोबत आलेले आहेत. त्यांच्या शोधार्थ अहमदनगर, औरंगाबाद, मालेगाव व दाक्षिणात्य राज्यात प्रत्येकी एक व जिल्ात दोन असे सहा पथके स्वतंत्र कार्यान्वित केले आहेत.औरगंाबादमध्ये घडली अशीच घटनादोन दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे, सीआयडीने दिलेल्या मार्गदर्शनातही औरंगाबाद, अहमदनगर, मनमाड, मालेगाव येथे अशा प्रकारचे गुन्हे घडले असल्याचे म्हटले आहे. दाक्षिणात्य राज्यातील नेल्लुर जिल्ात अशाच प्रकार गुन्हे करणार्या गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांनी लक्ष विचलित करून बॅग लांबवणारी टोळी पकडली होती, तीदेखील याच राज्यातील होती.रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशीबॅग लांबविणार्या रेकॉर्डवरील २५ ते ३० गुन्हेगारांना रात्रीतून पोलीस स्टेशनला आणून चौकशी करण्यात आली.मात्र त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले.फंगर प्रिंटमध्येही काहीच निष्पन्न झाले नाही. गेल्या पाच वर्षातील गुन्हेगारांचेही रेकॉर्ड काढण्यात येत असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. तिसेच घटना घडली त्या ठिकाणचे मोबाईल टॉवरचे लोकेशनही काढले जात असल्याचे सुपेकर म्हणाले.