चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीची तपासणी
By admin | Published: February 17, 2016 2:00 AM
नागपूर : चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारी आणि कथित गोळीबारासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.
नागपूर : चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारी आणि कथित गोळीबारासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.सदरमधील तुली ते पूनम चेंबर मार्गावरील चिल ॲन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. गड्डीगोदाम भागातील काही गुंडांनी जेवण करीत असलेल्या तरुणींशी लज्जास्पद वर्तन केल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे आरोपींनी प्लेटांची फेकाफेक करून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर एकाच्या डोक्यावर बीअरची बाटली फोडली. जोरदार दगडफेक केली आणि एकाने माऊझरमधून ३ राऊंड फायर केले. या प्रकारामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तोडफोड करणारे गुंड तसेच हाणामारी करणाऱ्या रेस्टॉरंटच्या राज गजानन बिसन तसेच सोनपाल रतनसिंग राणा या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली.मात्र, कथित गोळीबाराबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, बीअरची बाटली डोक्यावर फुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा पोलिसांनी शोध लावला असून, त्याच्या जबानीतून या घटनेची सविस्तर माहिती उघड होणार असल्याचे पोलीस सांगत आहेत.---