नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. ते दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.रेल्वेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी आरपीएफचे जवान व तसेच सर्व टीटीई यांना गणवेश परिधान करणं सक्तीचं करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या दृष्टीनं सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी इस्रो, रेल टेक आणि भारतीय रेल्वे एकत्रितरीत्या काम करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रीपदावरून पायउतार करत ते पद पीयूष गोयल यांना बहाल करण्यात आलं होतं. मोदी सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पीयूष गोयल यांनी पाच कलमी योजना आखली होती. एका वर्षाच्या आत मानवरहीत फाटक बंद करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत दिले होते.मानवरहीत रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तीन वर्षांचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. मानवरहीत रेल्वे फाटक आणि रुळावरून डबे घसरणे, यामुळे रेल्वे अपघात होतात. हे रोखण्यासाठी रेल्वेत ‘स्पीड’, ‘स्किल’ आणि ‘स्केल’ या धर्तीवर कामे करण्याचे आदेश पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या अपघातांची रेल्वे बोर्डातील अधिका-यांनी रेल्वेमंत्र्यांना माहिती दिली होती. मानवरहीत रेल्वे फाटकावर २०१६-१७ या कालावधीत ३४ टक्के अपघात झाले आहेत. नादुरुस्त रूळामुळे एक्स्प्रेस बोगी रुळावरून घसरते, अशी कारणे बोर्डाने दिली. तर रेल्वेत सुरक्षितता हीच प्राथमिकता असून, यात तडजोड करू नये, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या.तर रेल्वे अपघातांच्या मालिकांमुळेच सुरेश प्रभू यांना राजीनामा द्यावा लागला होता. रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नव्हते. यापूर्वी सुद्धा रेल्वेमंत्र्यांचा ‘अपघाता’ने घात केला आहे. यंदा (२०१६-१७) रेल्वे अपघातात २३८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे बोगी रुळावरुन घसरल्यामुळे सर्वाधिक १९३ जण मरणमार्गावर स्वार झाले. उपलब्ध आकडेवारीनूसार गत १७ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०१५-१६ साली १२२ जणांचा मृत्यू झाला.यात बोगी घसरल्यामुळे ३६ जणांचा समावेश आहे. देशातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यास सक्षम नाही. हे या आकडेवारीवरुन हे सत्य पुन्हा एकदा ठळक होत आहे.
इस्रो बनवणार भारतीय रेल्वेला हायटेक, प्रत्येक डब्यात लागणार सीसीटीव्ही- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 5:42 PM
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे.
ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी इस्रोचीही मदत घेणार असल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले आहेत.