शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
4
सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला
5
१७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या
6
Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी
7
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
8
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
9
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
10
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टीने उभारलाय ८० फूट उंच कदंब साम्राज्याचा भव्य सेट, 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग
11
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
12
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
13
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
14
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
15
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
16
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
17
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
18
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
19
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!

जिल्हा बँकेच्या ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षितता : तिजोरीसाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 12:10 AM

जळगाव : जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह जिल्हा बँक शाखेतील रक्कम सुरक्षित रहावी यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.

जळगाव : जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह जिल्हा बँक शाखेतील रक्कम सुरक्षित रहावी यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
गाळण येथील जिल्हा बँक शाखेत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकला होता. यात वॉचमनला मारहाण करीत तिजोरी फोडून चोरट्यांनी आठ लाखांची रक्कम लुटून नेली होती. यापूर्वीदेखील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता. त्या अनुषंगाने जिल्हा बँक प्रशासनाने सर्व शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व नवीन तिजोरी बसविण्याचा निर्णय घेतला होता.
५० शाखांमध्ये काम सुरू
सध्या जिल्हा बँकेतर्फे ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही व अलाराम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जळगाव येथील शकुंतला एण्टरप्रायजेस्मार्फत हे काम सुरू आहे. जिल्हा बँक शाखेत वॉचमन नियुक्तीला बँकने यापूर्वीच परवानगी दिली आहे. सीसीटीव्ही व अलाराम बसविल्यामुळे चोरट्याच्या हालचाली टिपता येणार आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी किंवा दरोड्याच्या घटना झाल्यानंतर आरोपींना पकडता येणे सहज शक्य होणार आहे.

गोदरेज कंपनीसोबत चर्चा सुरू
जिल्हा बँकेतर्फे सीसीटीव्ही सोबतच संपूर्ण २५० शाखांमधील तिजोरी बदलविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा बँक प्रशासन गोदरेज व स्टीलेज या दोन कंपनीसोबत चर्चा करीत आहेत. गॅस कटरचा वापर केला तरीदेखील ही तिजोरी तोडता येणार नाही अशा मजबूत तिजोरीच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. गोदरेज कंपनीतर्फे काही दिवसात याबाबतचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होऊन सर्व २५० शाखांमध्ये या तिजोरी बसविण्यात येणार आहे.

कोट
जिल्हा बँकेतील ५० शाखांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. लवकरच तिजोरी बदलविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गोदरेज व स्टीलेज कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जळगाव