शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CDS Rawat Helicopter Crash: तांत्रिक बिघाड नव्हे, तर 'या' कारणामुळे बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं! IAF चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 9:07 PM

CDS Rawat Helicopter Crash: भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे.

CDS Rawat Helicopter Crash: भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्यासह १४ जणांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे.  ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर अपघातानंतर फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचं विश्लेषण करण्यात आलं. यात हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारणं नसल्याचं म्हटलं आहे.

प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाला त्यामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले, असं नमूद करण्यात आलं आहे. तपास पथकानं अपघाताचं संभाव्य कारण जाणून घेण्यासाठी सर्व उपलब्ध साक्षीदारांची चौकशी केली. याशिवाय फ्लाइट रेकॉर्डर आणि कॉकपिट वॉयर रेकॉर्डरची तापासणी केली. यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे सर्व विश्लेषण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच कोर्ट ऑफ इन्क्वायरीनं काही शिफारसी केल्या असून त्यांचं पुनरावलोकन केलं जात आहे. 

हेलिकॉप्टर नियंत्रणात असूनही झालं क्रॅशहवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ट्राय-सर्व्हीस तपास पथकानं केलेल्या चौकशीनंतर अपघाताचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलं आहे. ५ जानेवारी रोजी त्यांनी तपासातील निष्कर्षाची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही दिली आहे. त्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलेले हेलिकॉप्टर पूर्णपणे पायलटच्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण ढगांमुळे ते त्याच्या ताब्यात असतानाही कोसळले. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, अशा अपघातांमध्ये पायलट किंवा क्रू मेंबर्सना धोक्याची कल्पना नसते. 

आठ डिसेंबर रोजी घडला होता अपघात८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सैन्याचे १२ जवान सुलूर एअरबेस येथून वेलिंगटन एअरबेसच्या दिशेनं रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. हेलिकॉप्टर इच्छित ठिकाणी पोहोचण्याच्या काही मिनिटांआधीच सुलूर एअरबेस कंट्रोल रुमचा हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली होती. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान