नवी दिल्ली/उदगमंडलम - हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे अपघातानंतरही जिवंत होते. अपघातानंतर Mi-17V5 हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढताना त्यानी हिंदीत आपले नावही सांगितले. बचाव पथकातील एका सदस्याने ही माहिती दिली आहे. जनरल रावत यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीलाही बाहेर काढण्यात आले. नंतर त्याची ओळख ग्रुप कॅप्टन वरुण सिंह, अशी झाली. ग्रुप कॅप्टन हे अपघातात बचावलेले एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हळू आवाजात सांगितलं नाव -अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. मुरली म्हणाले, आम्ही त्यांना बाहेर काढताच ते संरक्षण कर्मचाऱ्यांशी अत्यंत हळू आवाजात हिंदीतून बोलले आणि त्यांचे नाव सांगितले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मुरली यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांना तत्काळ दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. ज्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चादरीत गुंढाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात -मुरली म्हणाले, "जनरल रावत यांनी सांगितले, की त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाळा गंभीर इजा झाली आहे. यानंतर त्यांना चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले." यावेळी, परिसरात बचाव कार्यादरम्यान बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. येथे आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे वाहन नेण्यासही मार्ग नव्हता. मुरली म्हणाले, आम्हाला जवळची नदी आणि घरांमधून भांड्याने पाणी आणावे लागले. ऑपरेशन खूप कठीण होते, कारण आम्हाला लोकांना वाचवण्यासाठी अथवा मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचे टोकदार तुकडे आधी बाजूला करावे लागले.
बचाव कार्यात तुटलेल्या झाडाचा अडथळा - मुरली म्हणाले, बचावकार्यात एका तुटलेल्या झाडाचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. ते कापावे लागले. या सर्वांमुळे आमच्या बचाव कार्याला विलंब झाला. आम्ही 12 मृतदेह बाहेर काढले. तर दोघांना जिवंत बाहेर काढले. हे दोघेही गंभीर रित्या भाजले होते. नंतर भारतीय हवाई दलाचे जवान अर्ध्या रस्त्यात बचाव कार्यात सहभागी झाले. त्यांनी टीमला घटना स्थळी नेले. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठां फायरमनने सांगितले, की ढिगाऱ्यांत शस्त्रेही पडलेली होती. यामुळे आम्हाला सावधगिरीने काम करावे लागले.