कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते. जगभरात ही परंपरा पाळली जाते.भारतात १९५० पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी २९ जानेवारीला रायसीना हिल्सच्या विजय चौकात या सोहळ््याचे आयोजन केले जाते.तिन्ही सैन्यदले, पोलीस, निमलष्करी दलाचे सेनेचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एकाचवेळी सलामी.सैन्याच्या बँडचे ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘वंदे मातरम्’ अशा २६ रचनांवर शिस्तीत संचलन, त्यातील २५ रचना भारतीय होत्या.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक देशांमधून आलेले पाहुणे उपस्थित.- 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप- 04 दिवस चालतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा- 18 लष्करी बँडचा होता सहभाग- 15 पाइप आणि बँड सहभागी
बीटिंग रिट्रीटने झाला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:24 AM