जोशीमठाच्या पुनर्निर्माण योजनेला केंद्राची मंजुरी; 1658.17 कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 08:16 PM2023-11-30T20:16:07+5:302023-11-30T20:16:55+5:30
जोशीमठ हे भूस्खलनामुळे बाधित झाले असून केंद्र सरकारने राज्याला सर्व आवश्यक तांत्रिक व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून दिली आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने उत्तराखंडच्या जोशीमठाच्या पुनर्निर्माण योजनेला आज मंजुरी दिली आहे. भूस्खलनामुळे जोशीमठ धोक्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जोशीमठसाठी 1658.17 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या पुनर्रचना कक्षाकडून 1079.96 कोटी रुपयांची केंद्रीय मदत दिली जाणार आहे. तर उत्तराखंड सरकार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 126.41 कोटी रुपये आणि मदतीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 451.80 कोटी रुपये देईल. यामध्ये पुनर्वसनासाठी 91.82 कोटी रुपयांच्या भूसंपादनाचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शनाखाली तीन वर्षांच्या कालावधीत जोशीमठ रिकव्हरी योजना राबविली जाणार आहे. यानंतर जोशीमठ हे परिस्थिती स्थिरतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उदयास येईल, असे एका निवेदनात म्हटले आहे.
जोशीमठ हे भूस्खलनामुळे बाधित झाले असून केंद्र सरकारने राज्याला सर्व आवश्यक तांत्रिक व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून दिली आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.