- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रासह सहा राज्यांतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतित झाले असून, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांशी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू ही ती राज्ये होत. महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक नवे रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासात राज्यात ८,३३३ नवे रुग्ण सापडले आहेत. हीच संख्या केरळात ३,६७१ आणि पंजाबात ६२२ आहे. मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रात ३४,४४९ सक्रिय रुग्ण आढळले. फेब्रुवारीतील रुग्णसंख्या ६८,८१० आहे.
सावध राहा...n या बैठकीला संबंधित राज्याच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय आरोग्य सचिव, ‘आयसीएमआर’चे महासंचालक, नीती आयोगाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समूहाचे सदस्य आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.n उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधातील उपाययोजना सुरूच ठेवण्यात याव्यात तसेच सावधानता कमी करू नये, अशा सूचना या राज्यांना करण्यात आल्या. कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी वाढविण्याचे निर्देशही या राज्यांना देण्यात आले आहेत.
लसीकरणाला वेगदेशात आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धे अशा एकूण १ कोटी ४२ लाख ५४७ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण ६६ लाख ६९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर २४ लाख ५४ हजार जणांना दुसरा डोस दिला गेला आहे.
लस घेणे बंधनकारकपंजाबने आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेणे सक्तीचे केले आहे. लस घेतली नाही आणि कोरोनाची लागण झाली, तर तुमचा खर्च सरकार करणार नाही, असे पंजाब सरकारने या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.