नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळच्या छांगला येथे समुद्र पातळीपासून १७६०० फूट उंचीवर आपले जमिनीवरचे केंद्र स्थापन केले आहे. हे जगातील सर्वाधिक उंच स्थळी असलेले केंद्र आहे.हे केंद्र नैसर्गिक शीतागार म्हणून कार्यरत राहील आणि तेथे पुढच्या पिढीसाठी दुर्मिळ आणि लुप्तप्राय होऊ घातलेल्या वैद्यकीय वनस्पती जतन करून ठेवण्यात येतील. डीआरडीओचे महासंचालक डॉ. एस. ख्रिस्टोफर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन पार पडले.
सर्वांत उंच ठिकाणी डीआरडीओचे केंद्र
By admin | Published: October 06, 2015 3:48 AM