शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरच्या किती लोकांनी संपत्ती खरेदी केली, केंद्रानं दिलं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:08 AM

'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Minister of State for Home Nityanand Rai) यांनी मंगळवारी लोकसभेत महत्वाची माहिती दिली आहे. घटनेतील कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील एकूण ३४ लोकांनी संपत्ती खरेदी केली आहे. बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते हाजी फजलूर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राय बोलत होते.

बसपा नेत्यानं विचारला होता प्रश्न -कलम ३७० हटल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशात (Union Territory) बाहेरील ज्या लोकांनी संपत्ती खरेदी केली, अशा लोकांचा आकडा गृह मंत्री सांगण्याची कृपा करतील? असा प्रश्न बसपा नेत्याने विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्य मंत्री म्हणाले, ३४ व्यक्तींनी आतापर्यंत केंद्रशासित प्रदेशात संपत्ती खरेदी (Bought The Property) केली आहे.

गृह राज्यमंत्र्यांचं उत्तर - नित्यानंद राय म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीर सरकारने (Government of Jammu and Kashmir) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर बाहेरील ३४ व्यक्तींनी कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी केली आहे.' एवढेच नाही, तर 'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाInvestmentगुंतवणूक