काही दिवसापूर्वी ॲपल कंपनीने विरोधी पक्षातील काही नेत्यांना अलर्ट पाठवला होता. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारो सुरू होते, सरकारने फोन टॅपिंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर आता केंद्र सरकारने ॲपल कंपनीला नोटीस जारी केली असून कंपनीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अलर्ट संदर्भात कंपनीने मोठी अपडेट दिली आहे.
राजस्थानमध्ये ईडीची मोठी कारवाई! आयएएस अधिकाऱ्यांसह २५ ठिकाणी छापा; नेमकं प्रकरण काय?
देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आयफोनवर पाठवलेल्या अॅपल अलर्टबाबत कंपनीने चौकशीअंती आपल्या बाजूने ठामपणे उभे राहतील असे म्हटले आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसवर अॅपलने सांगितले की, आम्ही बाहेरून तज्ञांना बोलावून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानंतर जो काही निकाल येईल त्याची संपूर्ण माहिती देऊ.
सरकार प्रायोजित हेरगिरी प्रकरणांबाबत विरोधी पक्षाच्या खासदारांना अॅपलकडून अलर्ट मिळाल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. सरकारने म्हटले आहे की, 'सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी सीईआरटी-इनने अॅपलने पाठवलेल्या अलर्टची चौकशी सुरू केली आहे जी विरोधी पक्षांच्या खासदारांनी उपस्थित केली होती. यासंदर्भात कंपनीला नोटीसही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Apple कंपनीच्या जबाबदाऱ्यांबाबत बोलताना त्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिस्थितीचे आकलन करत आहोत आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते त्यांच्या मुख्यालयाशी सतत संपर्कात आहेत.'आवश्यक असल्यास आम्ही गोपनीयतेचे आणि उपकरणांचे काम सोपवण्यात आलेल्या टीम्ससोबत काम करु जेणेकरुन येथे काय घडत आहे हे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपास करता येईल.