नितीन अग्रवाल ।
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत नसल्याबद्दल केंद्र सरकारने राज्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड द्यावे लागू शकेल, असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे.
अनेक ठिकाणी आवश्यक सामानांची वाहतूक करत असलेले ट्रक्स जप्त केले गेले असून जीवनावश्यक वस्तुंच्या उत्पादनात असलेल्या कामगार/मजुरांना येण्या-जाण्याचे परवाने (पासेस) दिले गेले नाहीत. एका राज्याने दिलेले पासेस दुसरे राज्य मान्य करत नाही व कोल्ड स्टोरेज व गोदामाच्या संचालनाला परवानगी दिली जात नाही, असे गृह सचिवांनी राज्यांकडे नाराजी व्यक्त करताना म्हटले. सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या पत्रात गृहसचिव अजय भल्ला यांनी लिहिले आहे की, २४ मार्च रोजी जारी केलेल्या नियमांचे पालन अपेक्षितरित्या होत नाही. सगळ््या प्रकारचे ट्रक्स आणि मालवाहतुकीच्या वाहनांना राज्यांत आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची सूट आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या सामानावरून ना बंदी आहे ना त्यांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज आहे. रिकाम्या ट्रक्सनाही अडवले जाऊ नये.मजुरांना पास द्याच्जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात असलेल्या मजुरांना येण्या-जाण्यासाठी कोठेही अडवले जाऊ नये. रेल्वे, विमानतळ, बंदरे, कस्टमला कर्मचारी व कंत्राटी मजुरांना पास देण्याचे अधिकार दिले गेले आहेत. गरजेच्या वस्तू उत्पादनाच्या कारखान्यांत कामाला असलेल्यांना त्यांच्या मालकाच्या मान्यतेच्या आधारावर येण्या-जाण्यासाठीचे पासेस ताबडतोब दिले जावेत.च्पीठ (आटा), डाळी आणि तेल उत्पादन करणाºया छोट्या कारखान्यांसोबतच कोल्डचेन तथा गोदामाचे कामकाज कोणत्याही अडथळ्या शिवाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जावी. पत्रात आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या कोरोना हॉटस्पॉटना या गोष्टींपासून दूर ठेवण्याचा उल्लेख आहे.च्या नियमांना लागू करताना स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास विशेष काळजी घेण्यास पत्रात सांगण्यात आले आहे. या नियमांची माहिती जिल्हास्तरावरील अधिकारी आणि प्रत्यक्ष काम करणाºया एजन्सीजना द्यावी म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असेही भल्ला यांनी त्यात म्हटले आहे.