पाचव्या मजल्यावरून कोसळल्याने सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू प्रतापनगरातील घटना : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक गेला तोल
By admin | Published: August 31, 2016 9:44 PM
जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाखान्याच्या बांधकामाच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संतोष दौलत विसपुते (वय ४२, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत्यू झालेल्या सेंट्रिंग कामगाराचे नाव आहे. संतोष विसपुते हे अनेक वर्षांपासून सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीची बेताची असून हातमजुरीतून येणार्या उत्पन्नावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. त्यांना मुलगा नाही. रामेश्वर कॉलनीत ते पत्नीसह वास्तव्याला होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते गुलाब हटकर नावाच्या बांधकाम ठेकेदाराकडे कामाला होते. डॉ.रजनी नारखेडे यांच्या दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम याच ठेकेदाराच्या कामगार व मजुरांकडून सुरू आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे विसपुते हे सहकार्यांसोबत कामावर आले होते.कॉलमच्या वजनामुळे गेला तोलइमारतीच्या पाचव्या मजल्यावर कॉलम उभारणीचे काम सुरू होते. याठिकाणी विसपुते यांच्यासोबत जगन्नाथ बाविस्कर, भानुदास घुगे, सखाराम घुगे हे त्यांचे सहकारी कॉलम उभारणी करत होते. लोखंडी सळईचा कॉलम विसपुते यांनी पकडलेला होता. त्यांचे सहकारी कॉलमला लावल्या जाणार्या लाकडी पाट्या घेण्यासाठी बाजूला झाले. तेव्हा कॉलमचे वजन अधिक असल्याने त्यांचा एका बाजूला तोल जाऊन ते खाली कोसळले. पाचव्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कामावर असलेल्या त्यांच्या सहकार्यांनी त्यांना लागलीच जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांना अतिदक्षता विभागात व्हॅँटिलेटरवरही ठेवण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर त्यांना मृतावस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.घराचा खांबच खचला...या घटनेची माहिती झाल्यानंतर विसपुते यांचे जोशी कॉलनीत राहणारे जावई अजय दुसाने व इतर नातेवाईक, मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. विसपुते हे घरात एकटे कमावते होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.