नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या २९ फेबु्रवारीला वर्ष २०१६-१७साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. नरेंद्र मोदी सरकारने मे २०१४मध्ये सत्ता सांभाळल्यानंतर जेटलींचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल. अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी गुरुवारी येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली. जागतिक अर्थव्यवस्था संकटांच्या गर्तेत सापडली आहे. अशा स्थितीत भारताचा विकासदर कायम ठेवणे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यास भारत सक्षम आहे. त्याचमुळे यंदाचा अर्थसंकल्प आर्थिक सुधारणांवर बेतलेला असेल, असे संकेत त्यांनी दिले. अर्थसंकल्पाच्या तयारीला फार पूर्वीच सुरुवात झाली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २९ फेब्रुवारीला
By admin | Published: January 15, 2016 4:27 AM