नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यात यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर 5 मार्च ते 6 एप्रिल या काळात दुसरा टप्पात सुरु होणार आहे. तर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. तसेच, याचदिवशी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल, असे अनंतकुमार यांनी सांगितले. दरम्यान, ब्रिटिश परंपरेनुसार देशात आजवर फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, या परंपरेला छेद देऊन अर्थमंत्री अरुण जेटली येत्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार, अनंतकुमार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 7:59 PM
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांची माहितीदोन टप्प्यात यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार