सेन्ट्रल डेस्क बुलडाणा, वाशिमसाठी .....पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या अकोला जिल्ातील आडसूळ येथील घटना
By admin | Published: August 03, 2015 10:26 PM
तेल्हारा (जि. अकोला): पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आडसूळ येथे ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. अवघ्या तीनच महिन्यापूवीच या जोडप्याचा विवाह झाला होता. या खून व आत्महत्या प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.
तेल्हारा (जि. अकोला): पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आडसूळ येथे ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. अवघ्या तीनच महिन्यापूवीच या जोडप्याचा विवाह झाला होता. या खून व आत्महत्या प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.आडसूळ येथील संदीप ऊर्फ संभाजी पुंजाजी शेळके (२५) लहानपणापासूनच आडसूळ येेथे त्याचे मामा बाळकृष्ण नवलकार यांच्याकडे त्याच्या आईसोबत राहत होता. २८ एप्रिल २०१५ रोजी त्याचा विवाह बुलडाणा जिल्ातील मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील सुरेश सोनोनेसोबत झाला होता. ३० जुलै रोजी संदीपची पत्नी स्वाती पहिल्या आखाडीसाठी माहेरी गेली होती. २ ऑगस्ट रोजी संदीपने पत्नीला माहेरहून आणले होते. रात्री जेवण केल्यानंतर आई भावाकडे झोपायला निघून गेली. दरम्यान, अकोला येथून डॉ. उमेश नवलकार हे रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास अडसूळकडे परतत होते. यावेळी त्यांना वाहनाच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला संदिप जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले.त्यांनी तातडीने संदिपचे मामा बाळकृष्ण नवलकार यांना संदिप कारंजा -अंदुरा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आल्याचे भ्रमणध्वनीवरुन कळविले. मामांनी तातडीने संदिपचे घर गाठले. आवाज दिल्यानंतरही संदिप उठत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती कळविली. रात्री संदीप आणि स्वाती यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला असावा व त्यातून संदिपने पत्नीची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान, कारंजा-अंदुरा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या संदिपला रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदिप अपघातस्थळी कसा पोहोचला, वाहनाच्या धडकेत तो जखमी कसा झाला याबाबत रहस्य असून पोलिस तपासात याबाबी समोर येतील. याप्रकरणी पोलिसांनी मृतक संदिपविरुद्ध भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।