राहुल गांधींच्या सूचनेवर माेदींची माेहोर; कोरोना विषाणूवरील बूस्टर डाेसला केंद्र सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:27 AM2021-12-27T05:27:05+5:302021-12-27T05:27:38+5:30

Rahul Gandhi : या सूचनेवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी रात्री राष्ट्राला केलेल्या संबाेधनात अंमल केला.

Central government approves booster dose on corona virus, Rahul Gandhi's suggestion | राहुल गांधींच्या सूचनेवर माेदींची माेहोर; कोरोना विषाणूवरील बूस्टर डाेसला केंद्र सरकारची परवानगी

राहुल गांधींच्या सूचनेवर माेदींची माेहोर; कोरोना विषाणूवरील बूस्टर डाेसला केंद्र सरकारची परवानगी

Next

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी काही काळाने माेदी सरकारला करावी लागत आहे. काेराेना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बूस्टर डाेस देण्याची परवानगी देण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली हाेती. या सूचनेवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी रात्री राष्ट्राला केलेल्या संबाेधनात अंमल केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आधीसूचना करतात व त्याच सूचनांवर केंद्र सरकार अंमल करीत असल्याचे दिसत आहे. 

सर्वांचे लसीकरण
सरकारने आधी ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लाेकांसाठी लसीकरण बंधनकारक केले हाेते. यावर राहुल गांधी यांना सर्वांचे लसीकरण करा, अशी सूचना केली हाेती. काही महिन्यांनी केंद्र सरकारने सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

कृषी कायदे मागे
केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कृषी कायदे संमत केले हाेते. हे कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागतील, ताेपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, असे केंद्र सरकारला राहुल गांधींनी सुनावले हाेते. याची प्रचिती एक वर्षाने आली. 

बूस्टर डाेसची मागणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या २२ डिसेंबरला ट्विट करून बुस्टर डाेस देण्याची मागणी केली हाेती. देशातील बहुसंख्य लाेकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. केंद्र सरकार बुस्टर डाेस केव्हापासून सुरू करणार? अशी विचारणा ट्विटद्वारे केली हाेती. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी बुस्टर डाेस देण्याची घाेषणा केली. याबाबत रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Web Title: Central government approves booster dose on corona virus, Rahul Gandhi's suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.