शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'ते' अकाऊंट बंद न केल्यास कठोर कारवाई; सरकारची ट्विटरला फायनल नोटीस

By देवेश फडके | Published: February 03, 2021 4:36 PM

शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसारासंदर्भात सुरू केलेल्या ट्विटरवरील हॅशटॅगविरोधात कारवाई करण्यासाठी सरकराकडून ट्विटरला अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्विटरने याची दखल घेतली नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसरकारची ट्विटरला फायनल नोटीसनिलंबित केलेले अकाऊंट पूर्ववत करण्यासंदर्भात नोटीसट्विटरने दखल न घेतल्यास कारवाईचा सरकारचा इशारा

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागल्यानंतर आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसारासंदर्भात सुरू केलेल्या ट्विटरवरील हॅशटॅगविरोधात कारवाई करण्यासाठी सरकराकडून ट्विटरला अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे. ट्विटरने याची दखल घेतली नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. 

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली होती. मंत्रालयाच्या तक्रारीवरून निलंबित करण्यात आलेले सुमारे २५० अकाऊंट सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आले. यामुळे आता सरकारकडून ट्विटरला पाच पानी नोटीस पाठवण्यात आली आहे. 

धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि मजकूर हा चुकीच्या तथ्यांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ द्वेष पसरवण्याचा होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा मजकूर शेअर व्हावा, यासाठी प्रवृत्त करणारे कॅम्पेन चालवण्यात आले. हिंसेला प्रोत्साहन मिळेल, अशा आशयाचा मजकूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी असा मजकूर शेअर होणे धोकादायक आहे, असेही या नोटिसीत म्हटले आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरून नकारात्मक मजबूर ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून हा हॅशटॅग वापरून मजकूर शेअर करण्याऱ्या अनेकांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. मात्र, सोमवारी ट्विटरने हे अकाऊंट पुन्हा पूर्ववत केले. 

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकाने ट्विटरला नोटीस पाठवली होती. यामध्ये ट्विटरने सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हटले होते. वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्यांचे जे अकाऊंट पूर्ववत करण्यात आले, त्यावर ट्विटरने कारवाई करावी, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Twitterट्विटरCentral Governmentकेंद्र सरकार