नवी दिल्ली : सोशल मीडियात प्रचंड क्रेझ असणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्र सरकारने गुगलला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अॅप काढण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर लोकांना टिकटॉक अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येईल.सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा आदेश काढला. टिकटॉक अॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र काही जण या अॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिकटॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
टिक-टॉक अॅपवर केंद्र सरकारची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:35 IST