लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील खतांच्या वाढत्या किमतीची शेतकऱ्यांना झळ बसू नये म्हणून २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २२ हजार ३०३ कोटी खर्चाच्या पोषण आधारित अनुदानाच्या दरांना बुधवारी मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ही गिफ्ट देण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांसाठी घेतलेले निर्णय १ ऑक्टोबरपासून ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहतील.
दरवाढ नाही (सर्व दर प्रतिबॅग)
युरिया २६६ रु.डीएपी १३५० रु.नपीके १४७० रुएसएसपी ५०० रु.एमओपी १६५५ रु. (४५ रुपयांची घट)