शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

BREAKING: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; मोदी सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 8:10 PM

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी कर्पुरी ठाकूर यांची १०० वी जयंती असून, या पूर्वसंध्येला सरकारने ही मोठी घोषणा केली. जनता दल युनायटेडने (JDU) कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. सरकारच्या या निर्णयानंतर जदयूने मोदी सरकारचे आभार मानले.  

कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आम्हाला ३६ वर्षांच्या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बिहारच्या १५ कोटी जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानू इच्छितो.

कोण होते कर्पुरी ठाकूर?बिहारचे जननायक म्हणून कर्पुरी ठाकूर यांची ओळख होती. कर्पुरी ठाकूर १९७० च्या दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्रीही होते. स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच शिक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. मागासलेल्या समाजातून आलेला नेता म्हणून त्यांनी जनतेच्या मनात घर केले. मंडल आंदोलनापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण दिले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. 

२४ जानेवारी १९२४ रोजी जन्मलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची ओळख स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि ज्येष्ठ समाजवादी राजकारणी अशी राहिली. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तसेच उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्ष नेते अशी विविध पदेही भूषवली होती. त्याबरोबरच १९५२ साली पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर ते दीर्घ राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभूत झाले नव्हते. आजच्या बिहारच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जाणारे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील कुमार मोदी हे त्यांचे शिष्य आणि राजकीय राजकीय वारसदार मानले जातात.

१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार...एक लढवय्या नेता म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या कर्पुरी ठाकूर यांनी १९५२ मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून विजयी होऊन प्रथमच आमदार होण्याचा मान पटकावला. १९६७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत युनायटेड सोशलिस्ट पार्टी कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आली. याचा परिणाम राज्यातील सत्तेवरही झाला अन् काँग्रेसला जनतेने नाकारले. तेव्हा बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :BiharबिहारBharat Ratnaभारतरत्न