नवी दिल्ली: देशावर ओढावलेलं ऊर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. गेल्या चार दिवसात कोळशाचा साठा वाढवण्यावर भर दिला जातोय. एका महिन्यात परिस्थिती सामान्य होईल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. दैनंदिन वीज आणि कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. दरम्यान, उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्यांना उच्च किंमतीत वीज न विकण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा मंत्रालय जानेवारीपासून कोल इंडियाकडून स्टॉक घेण्यासाठी राज्यांना पत्र लिहित आहे, परंतु राज्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कोल इंडिया फक्त एका मर्यादेपर्यंत साठा करू शकतो कारण ओव्हरस्टॉकिंगमुळे कोळशाला आग लागण्याची भीती असते. कोल इंडियाच्या झारखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या कोळशाच्या खाणी आहेत पण उत्खणण कमी किंवा नसल्यातत जमा आहे.
एका कार्यक्रमात केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, वीज उत्पादकांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोळसा पुरवठा सध्या 19.5 लाख टन प्रतिदिन आहे, पण आता हा लवकरच 20 लाख टन केला जाणार आहे. कोळसा मंत्रालयात आम्ही या इंधनाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सोमवारी 19.5 लाख टन पुरवठा झाला. यातील 16 लाख टन कोळसा कोल इंडिया आणि उर्वरित सिंगराली कोलियरीज कंपनीने पाठवला होता. एकूण 19.5 लाख टन पुरवठा झाला.
कोळशाचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना
पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीज निर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोळसा मंत्रालयाला कोळशाचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे, तर रेल्वेला वीज प्रकल्पांना इंधन वाहून नेण्यासाठी रेक पुरवण्यास सांगितले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राजस्थान ते केरळपर्यंतच्या लोकांना वीज कपातीला सामोरे जावे लागते.
वीज संकट काळात रेल्वेचे मोठे पाऊल
देशातील वीज संकटादरम्यान रेल्वेनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. आता पॉवर प्लांटमध्ये कोळसा पोहोचवण्यासाठी गाड्या 24 तास चालवल्या जात आहेत. राष्ट्रीय वाहतूकदाराने कोळशाची ही कमतरता आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. सर्व झोनल रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजर्सना चोवीस तास ऑपरेशनल कंट्रोल रूम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.