जयपूर (राजस्थान) : नजीकच्या भविष्यात टोळधाडीला (लोकस्ट) तोंड देण्यासाठी केंद्र सरकारची लोकस्ट वॉर्निंग आॅर्गनायझेशन २५ ड्रोन्सची सेवा घेणार असून, वाहनावर बसविण्यात आलेली आणखी ६० कीटकनाशक फवारणी यंत्रे विकत घेणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाºयासोबत दशलक्षावधी टोळ भारतात प्रवेश करून खरीप पिकाला नष्ट करू शकतील, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला या टोळांचा हल्ला होऊ शकतो. भारतात टोळांचा प्रवेश आफ्रिकन देशांतून मान्सूनच्या अरबी समुद्रातील वाढत्या वाºयांसोबत होऊ शकतो, असे फरिदाबादस्थित लोकस्ट वॉर्निंग आॅर्गनायझेशनचे उपसंचालक के.एल. गुर्जर यांनी सांगितले. गुर्जर म्हणाले, टोळांसाठी उन्हाळा आणि पावसाळी हवामान हे अनुकूल असते व ते या दिवसांत एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी एका दिवसात १५० किलोमीटरचा प्रवास करून जातात. गेल्या महिन्यात भारतात टोळधाड आली होती. त्यांचे थवे जयपूरमध्ये पहिल्यांदाच आले. हे टोळ राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणांहून जयपूरमध्ये आले होते. टोळांचे हे संकट गेल्या अनेक वर्षांतील सगळ्यात वाईट होते. हे टोळ राजस्थानात एप्रिल महिन्यात पाकिस्तानात आले आणि नंतर ते पश्चिमेकडील राज्यांत जोरदार वाºयांमुळे पोहोचले.