शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार 'या' 3 मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकणार, 16500 कोटी रुपये उभारण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 19:43 IST

उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार कोल इंडिया, हिंदुस्थान झिंक आणि राष्ट्रीय केमिकल्समधील 5 ते 10 हिस्सा विकू शकते. महसूल वाढवण्याच्या उद्देशाने हा भाग आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विकला जाईल, असे अहवालात म्हटले आहे. 

किती रुपये उभारणारअहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या पातळीवर या कंपन्यांमधील 5 टक्के हिस्सेदारी विकूनही सरकारला 2 अब्ज डॉलर किंवा 16500 कोटी रुपये मिळू शकतात. मात्र, यासंदर्भात सरकार किंवा कोणत्याही कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान किंवा माहिती समोर आलेली नाही. तसेच या वृत्तांची पुष्टीही झालेली नाही.

या कंपन्यातील स्टेक विकणाररिपोर्टनुसार, सरकारच्या स्टेक सेल प्लॅनमध्ये विक्रीसाठी 4 ऑफर्स समाविष्ट आहेत. यामध्ये कोल इंडिया, एनटीपीसी, हिंदुस्थान झिंक आणि आरआयटीईएस यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार नॅशनल केमिकल्स फर्टिलायझर आणि नॅशनल फर्टिलायझरमधील 10 ते 20 टक्के स्टेक विकू शकते. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. 

अॅक्सिसमधील हिस्सा विकलापुढील आर्थिक वर्षात विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. सरकारने गेल्या आठवड्यात आयडीबीआय बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सेदारी विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून बोली मागवली. अलीकडेच, सरकारने अॅक्सिस बँकेतील 1.5 टक्के हिस्सा विकून 3839 कोटी रुपये उभे केले. सरकारने हा स्टेक स्पेशलाइज्ड अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) मार्फत ठेवला होता.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार