शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:53 IST

नव्या वक्फ कायद्यासंदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांचा भाजपा कार्यकर्त्यांना सल्ला

Waqf Bill Amendment Act: वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीबाबत सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी केले. प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘वक्फ सुधार जनजागर अभियाना’ निमित्त झालेल्या कार्यक्रमात रिजिजू बोलत होते. "वक्फ बाय युजर’ ही तरतूद अत्यंत घातक होती. यामुळे वक्फ संपत्ती ठरविण्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते. हीच परिस्थिती कायम राहिली असती तर संसदेच्या इमारतीवरही हक्क सांगितला गेला असता. त्यातून भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती," असे रोखठोक विधान रिजिजू यांनी व्यक्त केले.

मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर करा...

यावेळी रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकातील प्रमुख बाबींचे विस्ताराने विश्लेषण केले. रिजिजू म्हणाले, "नव्या कायद्यामुळे गोरगरीब मुस्लिमांचे भले होणार आहे. मात्र ज्यांनी वक्फच्या मालमत्तांची वर्षानुवर्षे लूट केली त्यांना वक्फ मंडळांवरील ताबा सोडायची इच्छा नाही. याचसाठी या विधेयकाविरोधात सामान्य मुस्लिमांना भडकावण्याचे प्रयत्न चालू आहेत. विविध माध्यमांचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांनी सामान्य मुस्लिमांच्या मनातील या कायद्याविषयीचे गैरसमज दूर करावेत."

तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती!

"गरीब मुस्लिमांना सध्याच्या वक्फ बोर्डाद्वारे काहीच फायदे होत नव्हते. त्यांना आता न्याय मिळेल. ज्यांनी अवैध पद्धतीने वक्फच्या माध्यमातून जमिनी हडप केल्या त्यांच्याकडून जमिनी काढून गोरगरीब मुस्लिमांना देण्यासाठी हे विधेयक आणले आहे. वक्फ कायद्यात २०१३ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर वक्फच्या ताब्यातील मालमत्ता प्रचंड वेगाने वाढल्या. ‘वक्फ बाय युजर’ ही तरतूद अत्यंत घातक होती. यामुळे वक्फ संपत्ती ठरविण्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते. हीच परिस्थिती कायम राहिली असती तर संसदेच्या इमारतीवरही हक्क सांगितला गेला असता. त्यातून भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती," असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डMuslimमुस्लीमBJPभाजपा