नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टाचे (Central Vista ) उद्घाटन केले. यानंतर 9 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सेंट्रल व्हिस्टा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा ज्यांना बघायला आहे, ते याठिकाणी येऊ शकतात. त्याचबरोबर, दिल्ली मेट्रो (Delhi Metro) येथे येणाऱ्या लोकांसाठी बस सेवा पुरविणार आहे.
डीएमआरसीने (DMRC) दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल व्हिस्टामध्ये येणाऱ्या लोकांना 4 ठिकाणांहून मेट्रो बस सेवा मिळू शकेल, ज्यामध्ये भैरों रोड, राजघाट, कॅनॉट प्लेस (म्युनिसिपल पार्किंगजवळ) आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा समावेश आहे. डीएमआरसीच्या म्हणण्यानुसार, या 4 ठिकाणांहून सेंट्रल व्हिस्टाला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना पिकअपची सेवा मिळेल.
दिल्ली मेट्रोद्वारे चालवल्या जाणार्या या इलेक्ट्रिक बसेस भैरों रोड, राजघाट, कॅनॉट प्लेस (म्युनिसिपल पार्किंगजवळ) आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणांहून पर्यटकांना घेऊन जातील आणि त्यांना नॅशनल स्टेडियम सी हेक्सागॉनच्या गेट क्रमांक 1 वर सोडतील. येथून इंडिया गेट/सेंट्रल व्हिस्टाला पायी जाता येते. यासोबतच ही सुविधा सुरुवातीला आठवडाभर उपलब्ध राहणार असून या मार्गांवर एकूण 12 बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस संध्याकाळी 5 वाजल्यापासून पर्यटकांसाठी उपलब्ध असतील आणि शेवटची पिकअप रात्री 9 वाजता असणार आहे.
दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत दिल्लीच्या इंडिया गेट आणि कर्त्यव्य पथला एक नवीन रूप देण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी ये-जा करण्यासाठी मेट्रोकडून बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. येथे लोक राजपथ, जो आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आणि इंडिया गेट पाहण्यासाठी येऊ शकतील. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या बांधकामामुळे इंडिया गेट आणि या परिसरात लोकांना भेट देता येत नव्हते.
सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूडीएमआरसीचे प्रधान कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल व्हिस्टा 9 सप्टेंबर 2022 पासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत दिल्ली मेट्रो त्या लोकांना बससेवा पुरवणार आहे. दिल्ली मेट्रो यासाठी इलेक्ट्रिक बस चालवत असून, जे सेंट्रल व्हिस्टाला भेट देण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ही बस उपलब्ध होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेअंतर्गत पूर्ण झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू, जो राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत पसरलेले आहे, तो दिल्लीतील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.