नवी दिल्ली - रमजानवेळी काश्मीरमध्ये आतिरेक्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. रमजानच्या महिन्यात दहशातवादाविरोधात कोणतीही शोधमोहिम न करण्याचा आदेश आज केंद्र सरकारने दिला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली होती.
रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्याविरोधात कोणतेही ऑपरेशन लॉन्च न करणयाचे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत. पण जर समोरुन दहशतवाद्यांकडून कारवाई झाली तर निर्दोष लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करण्याचा सुट भारतीय जवानांना देण्यात आली आहे.