देशात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्याची तयारी केली आहे. याशिवाय येत्या काळात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठीही तयारी सुरू केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसाराचा तपास करण्यासाठी केंद्रानं शनिवारी राज्यासाठी एक अॅडव्हायझरी जारी केली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य सचिवांनी राज्यांना तात्पुरती रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू करणं आणि या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंट्रोल रुम तयार करण्याची निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा स्तरावर नियंत्रण कत्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे.