CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:49 PM2021-05-11T16:49:50+5:302021-05-11T16:51:49+5:30

CoronaVirus: देशात बिकट परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवानाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

centre govt told delhi hc that workers at central vista project work site follow corona protocol | CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

Next
ठळक मुद्देनवीन संसद भवनाचे काम थांबवावेदिल्ली हायकोर्टात याचिका दाखलयाचिका फेटाळण्यात यावी, केंद्राची विनंती

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. देशात बिकट परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवानाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हे काम थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतीलउच्च न्यायालयात करण्यात आली आहे. (centre govt told delhi hc that workers at central vista project work site follow corona protocol)

देशात सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मात्र या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालये, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात येणार आहेत. कोरोनाचा कहर कायम असल्यामुळे हे काम थांबवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकाने कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वी हे काम सुरू झाल्याचे सांगितले आहे. 

कोरोना नियमांचे पालन

सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाचे केंद्र सरकारकडून समर्थन करण्यात आले आहे. हे काम कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वीच सुरू झाले आहे. तसेच या कामासाठी काम असलेले मजूर यांची योग्य काळजी घेतली जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. याशिवाय, मजुरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. काम थांबवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका खोट्या दाव्यांवर करण्यात आली असून, न्यायालयाने ही याचिका फेटाळावी, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी सांगितले. 

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड

सर्वोच्च न्यायालयाचा दखल देण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयातही सेंट्रल विस्टाचे काम थांबवण्यासंबंधीची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यात दखल देण्यास नकार दिला. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संसदेची नवी इमारत आणि सेंट्रल व्हिस्टा हे दोन प्रकल्प मोदींच्या अजेंड्यावर होते. अगदी कोरोनाच्या काळातही सेंट्रल विस्टासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सरकारने किमान या काळात तरी प्राथमिकता बदलायला हवी होती, अशी टीका विरोधक करत आहेत.

बचत खाते जनधन खात्यात रुपांतरीत करायचेय? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३,२९,९४२ नवे रुग्ण आढळून आले असून, ३,८७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३७,१५,२२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत ३,५६,०८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
 

Web Title: centre govt told delhi hc that workers at central vista project work site follow corona protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.