पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:19 IST2019-02-05T16:12:41+5:302019-02-05T16:19:08+5:30

भारतीय सैन्य दलातील हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता.

Centre sends Rs 102 crore bill to Kerala for using IAF aircraft, choppers during flood relief ops | पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

पूरस्थितीत वापरलेल्या हेलिकॉप्टरचे पैसे द्या, केंद्राकडून केरळ सरकारला 102 कोटींचं बिल

नवी दिल्ली - केंद्र सरकारनेकेरळ सरकारला 102 कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे केरळमधील पूरस्थितीवेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जी मदत करण्यात आली होती, त्या हेलिकॉप्टरच्या वापरांचे हे बिल असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा मोदी-ममता वाद देशभर चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, केरळ सरकारला पाठविण्यात आलेले हे बिल पाहूनही अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 

भारतीय सैन्य दलातील हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता. नागरिकांना वाचविण्यासाठी, अन्नधान्य पूरविण्यासाठी, केरळच्या मदतीसाठी सैन्याचे जवान आकाश-पाताळ एक करुन केरळवासीयांच्या मदतीला धावले होते. त्यावेळी वायू दलानेही मोठी कामगिरी बजावली होती. मात्र, वायूदलाच्या या धाडसी कामगिरीची किंमत केंद्र सरकारने केरळ सरकारला मागितली आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला 102 कोटी रुपयांचे बिल जारी केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील पूरस्थितीवेळी वापरात आणलेल्या हेलिकॉप्टरचे हे बिल असल्याची माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

केरळमधील पूरस्थितीवेळी भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरने तब्बल 517 फेऱ्या केल्या. त्यामध्ये 3787 नागरिकांचा जीव वाचवला असून 1350 टन वजनाच साहित्याची देवाण-घेवाण केली आहे. तर, दुसऱ्या 634 फेऱ्यांमध्ये 584 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असून 247 टन सामानाची वाहतूक केली आहे. त्यामुळेच, 102.6 कोटी रुपयांचे बिल केरळमधील राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. याबाबत वायू दलाकडून संपूर्ण तपशील घेण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले. दरम्यान, केरळ सरकारकडून हे बिल केंद्रीय गृह विभागाला पाठविण्यात आले असून या बिलाची तपशीलवार माहिती घेण्याचं सूचवलं आहे. 
 

Web Title: Centre sends Rs 102 crore bill to Kerala for using IAF aircraft, choppers during flood relief ops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.