शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची मोठी ऑफर; दिवाळीआधीच 10000 रुपये देणार

By हेमंत बावकर | Published: October 12, 2020 1:48 PM

Special Festival Advance Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याची घोषणा केली असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देऊ केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याची घोषणा केली असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना LTC कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू करण्यात आली आहे. 

प्रवास भत्ता (LTC) चे कॅश व्हाऊचर देण्यात येणार आहेत. हे व्हाऊचर कर्मचारी बाजारात खर्च करू शकणार आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या स्कीमचा लाभ पीएसयू आणि सार्वजनिक बँकांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

एलटीसीच्या बदल्यातील नकदी व्यवहार डिजिटल करता येणार आहे. हा एलटीसी 2018-21 या काळातील असणार आहे. याद्वारे ट्रेन किंवा विमान प्रवास केल्यास करमुक्त असणार आहे. यासाठी कर्मचाऱ्याचे भाडे आणि अन्य खर्च तिप्पट असायला हवा. याचप्रकारे एखाद्या जीएसटी नोंद असलेल्या दुकानदाराकडून सामान डिजिटल पेमेंटने खरेदी केल्यास लाभ मिळणार आहे. अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्च करण्यामुळे 28 हजार कोटी रुपयांची रक्कम अर्थव्वस्थेत येणार आहे, असे सीतारामण यांनी सांगितले. 

याचबरोबर यंदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम लागू केली जाणार आहे. याद्वारे 10000 रुपयांची अॅडव्हान्स रक्कम सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. ही रक्कम ते 10 हप्त्यांमध्ये जमा करू शकणार आहेत. ही स्कीम मार्च 2021 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ही रक्कम प्रीपेड रुपे कार्डद्वारे दिली जाणार आहे. 

राज्यांना बिनव्याजी कर्जसीतारामन यांनी सांगितले की, बाजारातील रोख वाढविल्याने अर्थव्यवस्थेवर अनेक पटींनी परिणाम होतो. याचा केवळ आताच्याच नाही तर पुढील जीडीपीवरी परिणाम दिसेल. राज्यांना 12 हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज पुढील 50 वर्षांसाठी दिले जाणार आहे. तीन भागांमध्ये हे कर्ज वाटले जाईल. 2500 कोटी रुपये पूर्वोत्तर उत्तराखंड आणि हिमाचलला दिले जातील. तर 7500 कोटी रुपये अर्थमंत्रालयाच्या सूचनेनुसार इतर राज्यांना दिले जातील. तर उरलेले 2500 कोटी रुपये जी राज्ये आत्मनिर्भर योजनेतील चारपैकी 3 सुधारणा लागू करतील त्या राज्यांना दिले जातील. हे कर्ज 31 मार्च 2021 च्या आधी दिले जाईल, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :GovernmentसरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEmployeeकर्मचारीDiwaliदिवाळीBanking Sectorबँकिंग क्षेत्र