शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जेएनपीटीच्या अ‍ॅडिशनल लिक्विड कार्गो जेट्टीच्या कामाला केंद्राचा ब्रेक; ३१० कोटींचा खर्च, खासगी बंदरांच्या फायद्यासाठी हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:09 AM

जेएनपीटी बंदरात ३०० मीटर लांबीची जुनी केमिकल जेट्टी आहे. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय आहे. त्यामुळे दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक होते.

मधुकर ठाकूर

उरण : गुजरातमधील खासगी बंदरांच्या फायद्यासाठी आणि फक्त खासगीकरणाचाच ध्यास घेतलेल्या केंद्र सरकारनेजेएनपीटीच्या ३१० कोटी खर्चून सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅडिशनल लिक्विड कार्गो जेट्टीच्या कामाला ब्रेक देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जेएनपीटी बंदरात ३०० मीटर लांबीची जुनी केमिकल जेट्टी आहे. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय आहे. त्यामुळे दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक होते. जुन्या केमिकल जेट्टीची क्षमता ६.५ मिलियन टन इतकी आहे. अतिरिक्त जेट्टी आणखी ४६५ मीटर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केमिकल वाहतुकीची क्षमता आणखी ४.५ मेट्रिक टनांपर्यंत वाढणार आहे. या केमिकल जेट्टीचा पायाभरणी समारंभ मुंबईत नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते आॅगस्ट २०१९ रोजी करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील सुरू करण्यात आलेल्या कामावर १८१ कोटी ५० लाख ५२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाला १६ फेब्रुवारी २०२० रोजी सुरुवातही करण्यात आली आहे. या कामाची १५ ऑगस्ट २०२२ अंतिम मुदत आहे.याबाबत संबंधित विभागाच्या मंत्रालयाकडून लेखी स्वरूपात सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अ‍ॅडिशनल लिक्विड कार्गो जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती प्लॅनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे मुख्य व्यवस्थापक एस.व्ही. मदभावी यांनी दिली.

जेएनपीटी बंदरात खासगीकरण होणारसध्या जेएनपीटी बंदरात खासगीकरण करण्याचे वारे वाहू लागले आहेत. जेएनपीटीच्या मालकीचे उरलेल्या बंदराचेही खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जेएनपीटीत असलेल्या केमिकल जेट्टीव्यतिरिक्त गुजरात राज्यातही सरकारी, खासगी जेट्टी उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे केमिकल जेट्टीची आवश्यकता नसल्याचे सांगत, सुरू करण्यात आलेल्या जेट्टीचे काम तूर्तास थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असल्याचे जेएनपीटी अधिकारी आणि कामगारांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारJNPTजेएनपीटीGovernmentसरकार