शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

नेपाळमध्ये समन्वयाचे आव्हान

By admin | Published: April 30, 2015 2:15 AM

आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत.

भीषण परिस्थिती : अन्न, पाणी, ब्लँकेट्स, औषधांची मोठ्या प्रमाणात गरजकाठमांडू : आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत. भारत मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना आता ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्याचे मोठे आव्हान सध्या नेपाळला सतावत आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास विविध क्षेत्रांत तज्ज्ञ असलेल्यांच्या टीम्स नेपाळमध्ये दाखल होत आहेत. या सगळ््या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या महाप्रचंड कामाचे आव्हान नेपाळसमोर आहे. अजूनही दूरवरच्या क्षेत्रांमध्ये बचावकार्य सुुरू झाले नसल्याने मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. नेपाळमध्ये अशी अनेक छोटी गावे आहेत, जिथपर्यंत मदत तर दूरच; पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे मृतदेह काढणेही सुरू झालेले नाही. त्यात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजारांचा फैलाव होण्याचीही भीती आहे. काठमांडू पर्वतरांगांमध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पैकी गोरखा जिल्ह्यात देखील बचाव आणि मदतकार्य सुरू झालेले नाही. भूकंपानंतर प्रथमच उघडली दुकानेच्नेपाळचा ग्रामीण भाग सध्या वीज, पाणी, अन्न आणि औषधांसाठी अक्षरश: तडफडत आहे. तात्पुरते तंबू, वैद्यकीय मदतनीस आणि स्वयंसेवकांची या मदतकार्यासाठी आत्यंतिक गरज आहे. पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे टॅक्सीचालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे. च्काठमांडूमधील स्थिती आता अत्यंत धिम्या गतीने पूर्वपदावर येत आहे. भूकंपानंतर आज पहिल्यांदा काठमांडूमधील दुकाने उघडली आहेत. जे तरुण व्यावसायिक आहेत, ते काही वेळ दुकानात घालवून शक्य तेवढा वेळ मदतकार्यासाठी देत आहेत.हिमालय कोपला!अनेक कुटुंबे भीतीच्या सावटाखाली जगत असून, स्वत:च्या घरामध्ये जाण्यासही ती तयार नाहीत. यात सर्वाधिक बिकट स्थिती लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध यांची आहे.