सत्य शोधण्याचे रामनगर पोलिसांसमोर आव्हान
By admin | Published: September 25, 2015 9:56 PM
भिस्त सीसी फुटेज व स्कोडाच्या चालकावर तपासचक्र वेगात : ड्रंक अँण्ड ड्राइव्ह प्रकरण डोंबिवली : बुधवारी पहाटे घडलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत पदपथावर झोपलेल्या मायलेकीला जीव गमवावा लागला. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगातील इनोव्हाची धडक समोरून येणार्या स्कोडाला बसल्याने ती बाजूकडील पदपथावर चढून ...
भिस्त सीसी फुटेज व स्कोडाच्या चालकावर तपासचक्र वेगात : ड्रंक अँण्ड ड्राइव्ह प्रकरण डोंबिवली : बुधवारी पहाटे घडलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत पदपथावर झोपलेल्या मायलेकीला जीव गमवावा लागला. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगातील इनोव्हाची धडक समोरून येणार्या स्कोडाला बसल्याने ती बाजूकडील पदपथावर चढून हा अपघात झाला होता. या घटनेत नेमका दोषी कोण याचा तपास करणे हे रामनगर पोलिसांसमोर पेच आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी होऊ नये यासाठी सत्य शोधण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे. आता पोलीस कसा शोध घेतात, तपास करतात, त्यातून जे सत्य असेल ते कसे जनतेसमोर आणतात याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे. अपघातग्रस्त इनोव्हा गाडी एका राजकीय पदाधिकार्याच्या मालकीची असल्याची माहिती आहे. पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाविरोधात दारूच्या नशेत गाडी चालविणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.त्याच्याकडून माहिती घेणे सुरु असल्याचेही सांगण्यात आले. तसेच स्कोडाच्या चालकाकडूनही माहिती घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी सीसी कॅमेर्याचे फुटेजही तपासण्यात येत आहेत. ------------------ तपास यंत्रणा कामाला लागली असून जे सत्य आहे ते निितच समोर येईल. घटनेतील सर्व शक्यता पडताळण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याबाबत ज्या कोणाला याबाबतची माहिती असल्यास त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे.सुनिल शिवरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे-----------------