चंपारण जिल्ह्यातील पटपरिया येथील रहिवासी असलेल्या नवनीत राज यांची आयबीपीएस एसओ अंतर्गत राजभाषा अधिकारी या पदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यसैनिक स्व. नरसिंह पाठक यांचे नातू व स्व. हरेंद्र किशोर पाठक यांचे पुत्र आहेत. नवनीत यांना हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, खूप मेहनत करावी लागली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची
नवनीत 11 वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं. नवनीत मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यांचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. वडिलांच्या अकाली निधनानंतर, आई लक्ष्मीदेवीने आपली पाच मुलं आणि मुलींना कसं तरी शिकवलं. नवनीत भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्याच्या चार मोठ्या बहिणींचे लग्न झाले आहे.
नवनीत यांचे आजोबा नरसिंह पाठक हे स्वातंत्र्यसैनिक होते. घरची परिस्थिती फारच बेताची होती. नवनीत यांच्या आईचे म्हणणे आहे की, पतीच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. ते खूप कठीण दिवस होते. मी माझ्या मुलाला नेहमी समजावून सांगितले की, वडील जसे डॉक्टर होते, त्याचप्रमाणे तुम्हीही लिहून वाचून चांगले व्हा.
नवनीतने सरला ब्रह्मा डीएव्ही स्कूलमधून मॅट्रिक, मोतिहारीच्या एलएनडी कॉलेजमधून इंटर, महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ दिल्लीतून पत्रकारितेचा डिप्लोमा आणि इग्नूमधून हिंदीमध्ये पीजी केले आहे. मी बँकिंगची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रिलिम्ससाठी रिझनिंग, चालू घडामोडी आणि इंग्रजी महत्त्वाचे आहेत. म्हणूनच इंग्रजी थोडे चांगले करण्याकडे विशेष लक्ष दिले गेले.
नवनीतने आपल्या यशाचे श्रेय त्याची आई लक्ष्मी देवी, काका कौशल किशोर पाठक, काका राजेश्वर तिवारी आणि इतरांना दिले आहे. ते सांगतात की राजभाषा अधिकारी यांच्या IBPS SO परीक्षेत फक्त तेच लोक बसू शकतात, ज्यांनी पदवीचा पेपर म्हणून इंग्रजीचा अभ्यास केला आहे आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यावेळी विविध बँकांमध्ये राजभाषा अधिकारी यांच्यासाठी 50 पदे निर्माण करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"