ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी बाजारात आणणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. त्यामुळे 5 आणि 10 रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात येणार आहेत. तसेच बाजारात लवकरच 5 आणि 10 रुपयांच्या नव्या नाण्यांनी व्यवहार करावा लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात आरबीआयच्या अधिका-यांनी ही माहिती दिली आहे.10 रुपयांच्या नव्या नाण्यांमधील एका बाजूला राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेच्या इमारतीचे चित्र छापण्यात येणार असून, त्यावर 125 वर्षे असा उल्लेख करण्यात येणार आहे. 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेले बोधचिन्हही या नाण्यांवर पाहायला मिळणार आहे. 1891 ते 2016 असं या नाण्याच्या वर आणि खालील बाजूस लिहिलेले असेल. सध्या बाजारात असलेले दहा रुपयाची नाणीही चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले.पाच रुपयांची नवी नाणीही बाजारात चलनात येणार आहेत. पाच रुपयांच्या नाण्यांवर अलाहाबाद हायकोर्टाचे चित्र असेल. या नाण्यांवर 1866 ते 2016 असा उल्लेख केलेला पाहायला मिळणार आहे. 5 रुपयांच्या नवीन नाण्यांसोबतच जुनी नाणीही चलनात राहणार असल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.
लवकरच पाच आणि दहा रुपयांची नवी नाणी येणार चलनात
By admin | Published: April 27, 2017 5:21 PM