चंदीगड- पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं. पुलवाम्यातील या आत्मघातकी हल्ल्यानंतर पंजाब आणि काँग्रेसमधलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परस्पर विरोधी विधानं केली आहेत. सिद्धू म्हणाले, दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित होणं गरजेचं आहे. काही लोकांच्या कृत्यासाठी एखाद्या देशाला दोषी ठरवू शकत नाही. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाकिस्तानबरोबर चर्चा नव्हे, तर कारवाई करण्याची गरज आहे, असं मत अमरिंदर यांनी व्यक्त केली आहे.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानांत मतभिन्नता आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. करतारपूर का बंद करण्यात आलं. करतारपूरशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती भाविक म्हणून येते तेव्हा ती वेगळी असते. तसेच या समस्यांचं मुळापर्यंत जाऊन त्या संपवल्या पाहिजेत, असं मला वाटत असल्याचं सिद्धूनं सांगितलं आहे.
सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 5:31 PM