नवी दिल्ली - पंजाबच्या अमृतसरमध्ये एक भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. या अपघातातपंजाबी इंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय गायक दिलजानचा (Punjabi Singer Diljaan Died) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. जंडियाला गुरुजवळ ही दुर्घटना घडली. भीषण अपघातात दिलजानचा जागीच मृत्यू झाला आहे. 2 एप्रिल रोजी दिलजानचं एक नवं गाणं रिलीज होणार होतं. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचं निधन झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3.45 सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ दिलजानचा अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिलजानला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दिलजानचा अपघात नेमका कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. "आज सकाळी अतिशय दु:खद बातमी मला कळाली. संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झालं आहे. दिलजानचे निधन झाले" असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. दोन एप्रिल रोजी त्याचं नवीन गाणं रिलीज होणार होते. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचे निधन झालं. गाण्याबाबतच एक मीटिंग करण्यासाठी तो अमृतसर येथे गेला होता. मात्र परतताना हा भीषण अपघात झाला आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.