नवी दिल्ली : हरयाणातील जाट आरक्षणाच्या आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद झाल्याने ज्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी विमानाने जाण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा प्रवाशांना चंदीगडहून दिल्लीला येण्यासाठी तब्बल ८९ हजार रुपये मोजावे लागले. चंदीगडहून अन्य ठिकाणी जाणाऱ्यांकडूनही विमान कं पन्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा म्हणाले की, जगभरात कुठेही विमानांच्या तिकीट दरांवर नियंत्रण नाही. अर्थात जाट आंदोलनामुळे पर्यटकांना विमानाखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी तिकिटांचे दर खूपच वाढवले.
चंदीगड- दिल्ली विमान भाडे ८९ हजार
By admin | Published: February 23, 2016 12:35 AM