काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे; काय आहे संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:45 AM2024-01-04T11:45:15+5:302024-01-04T11:51:18+5:30

ईडीच्या अनेक टीम काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहोचल्या.

chandigarh ed raid in haryana 3 districts- congress and bjp leaders house raided in illegal mining | काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे; काय आहे संपूर्ण प्रकरण?

फोटो - hindi.news18

ईडीने गुरुवारी हरियाणातील अनेक ठिकाणी छापे टाकले. ईडीने सोनीपत, कर्नाल आणि यमुनानगर येथील भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या वेगवेगळ्या टीम हरियाणातील तीन जिल्ह्यांमध्ये पोहोचल्या आहेत. 

सोनीपतमधील बेकायदेशीर खाणकाम संदर्भात ईडीच्या अनेक टीम काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहोचल्या. काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी ईडीचे अधिकारी खाणकामाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत. यावेळी आमदार सुरेंद्र त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. ईडीची टीम सुरेंद्र यांचा सहकारी सुरेश त्यागी याच्या घरीही पोहोचली आहे.

भाजपा नेते मनोज वधवा यांच्या कर्नाल येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. मनोज वाधवा यांचे घर सेक्टर 13 मध्ये आहे, जिथे ईडीची टीम कागदपत्रे स्कॅन करत आहे. वाधवा हे यमुनानगर येथील खाण व्यवसायाशी संबंधित आहेत. 

2014 मध्ये त्यांनी मनोहर लाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच ईडीची टीम यमुनानगर येथील माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरीही पोहोचली आहे. यमुनानगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अवैध उत्खननाविरोधात हा छापा टाकण्यात आला आहे.
 

Read in English

Web Title: chandigarh ed raid in haryana 3 districts- congress and bjp leaders house raided in illegal mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.