"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:42 AM2021-12-15T10:42:38+5:302021-12-15T10:43:19+5:30

Captain Amarinder Singh And Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.

chandigarh former cm Captain Amarinder Singh said channi role in election committee like night watchman | "आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - पंजाबमध्येराजकारण तापलं आहे. काँग्रेसकडून नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच "मला त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट वाटतं. जबरदस्त क्षमता असूनही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासमोर दुय्यम वागणूक दिली जात आहे. चन्नी आता फक्त नाईट वॉचमन बनूनच राहतील" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांपेक्षाही दुय्यम दर्जा मिळण्याचा प्रकार याआधी कधीच घडला नाही असं म्हटलं आहे. तसेच "कोणत्याही स्वाभिमानी नेत्याने अशी मानहानी सहन करता कामा नये" असा देखील सल्ला दिला आहे. "चरणजीत सिंग चन्नी हे फक्त अनुसूचित जातीची मतं मिळवण्यासाठी शोपीस होते का?" असा सवाल देखील सिंग यांनी उपस्थित केला आहे. "कुणीतरी बालिश मुलाप्रमाणे वागतंय आणि दिवसरात्र नवनव्या मागण्या करतंय, म्हणून तुम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि असं करताना चांगलं काम करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांची मानहानी करत आहात."

"काँग्रेस आता आणखी गाळात जात आहे" असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाबकाँग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल (Congress Pratipal Singh Baliawal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचं कारण त्यांनी दिलं. तसेच बलियावाल हे हरयाणा, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ मीडिया विश्लेषक देखील होते. सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. 

"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण"

बलियावाल यांनी राजीनामा पत्रात "प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे" असं म्हटलं आहे. तसेच "पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहेत" असं देखील प्रितपाल सिंग बलियावाल यांनी म्हटलं आहे. 

"नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी करत आहेत."
 

Web Title: chandigarh former cm Captain Amarinder Singh said channi role in election committee like night watchman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.