शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 4:16 PM

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपने भाजपाला जोराचा धक्का दिला होता.

ठळक मुद्देआपच्या उमेदवारांनी भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला आहे. येथील एकूण 35 जागांचे कल हाती आले असून आप 14, काँग्रेस 8, भाजपा 12 आणि अकाली दल एका जागेवर विजयी झाले आहेत

चंदीगड - भाजपाचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचे दिसून येते. कारण, येथील महापालिका निवडणुकीत 35 जागापैकी 14 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्ष पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला आहे. तर, भाजपला 12 जागा जिंकता आल्याने भाजपची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. काँग्रेसने 8 जागा जिंकत तिसरे स्थान पटकावले. तब्बल 15 वर्षानंतर भाजपची येथे पिछेहट झाली आहे. 

चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपनेभाजपाला जोराचा धक्का दिला होता. पालिकेतील वॉर्ड क्र. १७ मध्ये आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी महापौर रविकांत यांना ८२८ मतांनी पराभूत केले. त्यामुळे येथील महापालिका निवडणुकीत यंदा सत्तांतर होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच, आम आदमी पक्षाने आता 14 जागा जिंकत येथे वर्चस्व निर्माण केले. 

दरम्यान, आपच्या उमेदवारांनी भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला आहे. येथील एकूण 35 जागांचे कल हाती आले असून आप 14, काँग्रेस 8, भाजपा 12 आणि अकाली दल एका जागेवर विजयी झाले आहेत. यावेळी चंढीगडच्या निकालांनी सर्वच राजकीय पंडितांना धक्का दिला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाला जोरदार टक्कर दिली. या निकालानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन हे बदलाचे संकेत असल्याचं म्हटलंय.  आपच्या सर्वच विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन. चंदीगढ महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा झालेला विजय हा येणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. चंदीगढच्या लोकांनी भ्रष्ट राजकारणाला नाकारत आपच्या प्रामाणिक राजकारणाचा स्विकार केल्याचे केजरीवाल यांनी म्हटलंय. 

चंदीगड महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ६० टक्के मतदान झाले होते. येथील प्रभागांची संख्या २०१६ मध्ये २६ होती. तर आता ही संख्या वाढून ३५ करण्यात आली आहे. येथील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये मुख्य लढत असते. मात्र आता आम आदमी पक्षही मैदानात उतरल्याने लढत तिरंगी झाली आहे.   

टॅग्स :BJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपchandigarh-pcचंडीगढ़