चंदीगड- पुलवाम्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. या जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्यात पाकिस्तानचाही हात असल्याची माहिती समोर आली असून, अनेक भारतीयांनी पाकिस्तानला धडा शिकवा, अशी भावना व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनं सोशल मीडियातून, तर काहींनी रस्त्यांवर उतरून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.चंदीगडमधल्या एका रिक्षाचालकानंही अनोख्या पद्धतीनं शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींनीही पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं सांगितलं असतानाच हा रिक्षाचालक रिक्षावर एक फलक लावून भलताच चर्चेत आला. पुलवामातील शहिदांवरच्या हल्ल्याचा बदला घेतल्यास महिनाभर रिक्षा मोफत चालवण्याचा निर्धार रिक्षाचालक अनिक कुमार यांनी केला आहे.तसेच त्यांनी संदर्भातील फ्लेक्सही रिक्षावर लावला असून, त्या बॅनरवर स्वतः नाव आणि नंबर दिला आहे. अनिल कुमार यांनी केलेली ही घोषणा मोदींनी ठोस कारवाई केल्यास सत्यात उतरू शकते. त्यामुळे सध्या तरी अनिल कुमार या रिक्षाचालकानं केलेल्या संकल्पाची सगळीकडेच चर्चा आहे.
Pulwama Attack:...हल्ल्याचा बदला घेतल्यास एक महिना रिक्षा मोफत चालवणार, रिक्षाचालकाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:47 PM